यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील अब्दुल गफूर शहा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन तसेच नृत्य सादरीकरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सारीकरणावर आक्षेप घेत भाजपाचे उमरखेडचे नेते गोपाळ कलाने यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. ‘ये मर्द ये मुजाहिद तेरी एल्गार क्या है’ असे या गाण्याचे नावअसून ते स्नेह संमेलनामध्ये गायले गेले तसेच त्यावर नृत्यही करण्यात आले आहे, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. हे गाणे पाकिस्तानसाठी लष्करी स्फूर्तीगीत म्हणून ओळखले जाते.
या गाण्याचा इतिहास काय?
हे गाणे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात प्रभावी आणि प्रसिद्ध देशभक्तीपर गीतांपैकी एक आहे. हे प्रामुख्याने लष्करी स्फूर्तीगीत (Martial Anthem) म्हणून ओळखले जाते. हफीज जालंधरी यांनी हे गाणे लिहिलेले आहे. त्यांनीच पाकिस्तानचे राष्ट्रगीतदेखील लिहिलेले आहे. या गाण्याची निर्मिती १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात झाली. त्यावेळी पाकिस्तानमध्ये रेडिओवर हे गाणे सैनिकांचे आणि जनतेचे मनोबल वाढवण्यासाठी सतत प्रसारित केले जात असे. ‘ऐ मर्द-ए-मुजाहिद’ याचा अर्थ “हे धर्मयोद्ध्या” असा होतो. यात सैनिकाला त्याच्या शक्तीची आणि कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.
भारतासोबतच्या संघर्षातील संदर्भ आणि पुरावे
हे गाणे भारतासोबतच्या युद्धांमध्ये एक ‘मानसिक अस्त्र’ म्हणून वापरले गेल्याचे अनेक पुरावे मिळतात. ‘रेडिओ पाकिस्तान’च्या संग्रहातील माहितीनुसार युद्ध सुरू होताच राष्ट्रात जोश भरण्यासाठी हे गाणे मुख्य साधन बनले होते. अनेक इतिहासकारांच्या मते हे गाणे युद्धाच्या काळात “युद्धाची हाक” म्हणून वापरले गेले. लष्करी तज्ज्ञ आणि ‘द फ्रायडे टाइम्स’ सारख्या नियतकालिकांनुसार, जेव्हा जेव्हा भारतासोबत तणाव वाढतो (उदा. १९९९ चे कारगिल युद्ध किंवा २०१९ चा बालाकोट प्रसंग), तेव्हा या गाण्याचे नवीन व्हर्जन प्रसिद्ध करून जनतेमध्ये युद्धासाठी पोषक वातावरण तयार केले जाते. दरम्यान, आता पोलिसात तक्रार करण्यात आल्यानंतर पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

