मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार जंयत पाटील निलंबित; हिवाळी अधिवेशन तापलं

महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभेतील राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना निलंबीत करण्यात आलं आहे. नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांनी विधानसभेच्या अध्यक्षांबाबत अपशब्द वापरले होते, यामुळे हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जंयत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. जयंत पाटील यांच्या विधानाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. आजच्या कामकाजात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांंना अपशब्द वापरल्यामुळे निलंबनाची कारवाई मागणी व्हावी अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली होती, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादीच आमदार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केलं आहे. यानंतर विरोधकांनी अधिवेशनातून सभागृहाचा त्याग (वॉकआऊट) केलं आहे..

विधिमंडळ कामकाजात विरोधी पक्षांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला होता. यावरुनच ते आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अध्यक्ष तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला.

जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांनी आक्रमक पवित्रा घेत तुम्ही असे बोलू शकत नाही, निलंबन करा अशी मागणी केली. या मागणीवरुन भाजपा आमदार आक्रमक झाले ज्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटे तहकुब करण्यात आले होते.

जयंत पाटील यांच्या या विधानानंतर निलंबनाच्या कारवाईवर विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात बैठक सुरू झाली, त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते उपस्थित होते. या बैठकीत विधीमंडळ सचिवांनाही बोलावले होते, यानंतर जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply