मोठा दिलासा! कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली - एलपीजी गॅस सिलेंडरचे  नवीन दर जाहीर करण्यात आले आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कंपनीने कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी  सिलिंडरच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आजपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 198 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

विविध शहरांमध्ये दरवाढ झाली आहे

या निर्णयानंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2219 वरून 2021 रुपयांवर गेली आहे. तर मुंबईत त्याची किंमत 190.50 रुपयांनी कमी झाली आहे. कोलकात्यात त्याची किंमत 182 रुपयांनी स्वस्त झाली आहे तर चेन्नईमध्ये 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 187 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

मे महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ

दरम्यान याआधी गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 135 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्याचवेळी मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत दोनदा वाढ करण्यात आली होती. सर्वप्रथम 7 मे रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर 19 मे रोजीही त्यांची किंमत वाढवण्यात आली. जागतिक बाजारपेठेत क्रूडच्या किंमतीत नुकतीच घट झाल्यानंतर सर्वसामान्यांना घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत दिलासा मिळण्याची अपेक्षा होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply