मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांची घेणार भेट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर आज  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दौऱ्यावर आहेत.शिंदे-फडणवीस यांची केंद्रीय गृहमत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाहांसोबतची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय राज्यातील विकास कामांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी यावेळी अनेक विकास कामांच लोकार्पण आणि उद्घाटन केलं होतं. शिवसेना हे पक्षाच नाव आणि धनुष्यबाण याबाबत निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीवरही या बैठकीत चर्चा होण्याचा अंदाज आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *