मुंबई :  स्पाईसजेट फ्लाइटच्या विंडशील्डला गेला तडा; मुंबईत विमानाचे लँडिंग

मुंबई : दिल्लीतून दुबईला जाणारे स्पाईसजेट विमानाची आज अचानक लँडिंग करण्यात आल्याची घटना ताजी असताना मुंबईतही एका स्पाईसजेट विमानाचं अचानक लँडिंग करण्यात आलं आहे. स्पाईसजेटचं क्यू-४०० विमान हे २३ हजार फूट उंचीवर असताना विमानाच्या विंडशील्डला तडा गेला. त्यानंतर तत्काळ कांडला-मुंबई विमानाचं लँडिंग मुंबई विमानतळावर करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पाईसजेट विमान २३ हजार फूट उंचीवर असताना विमानाच्या विंडशील्डचा बाहेरचा भागाला तडा गेला. त्यानंतर वैमानिकाने तातडीने मुंबई विमानतळावर स्पाईसजेट विमानाचे लँडिंग करण्यात आलं आहे. या घटनेनंतर स्पाईसजेटकडून अधिकृत प्रतिक्रिया आली असून विमानाला सुरक्षितपणे लँडिंग केल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

गेल्या १७ दिवसांपासून स्पाईसजेट विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याची सातवी घटना आहे. मुंबईच्या घटनेआधी स्पाईसजेटचे एक विमान अचानक कराचीमध्ये लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारच्या या दोन्ही घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. या दोन घटनेव्यतिरिक्त आणखी पाच घटनांचा तपास देखील सुरू करण्यात आला आहे.

स्पाईसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड; कराचीत इमर्जन्सी लँडिंग

दिल्लीतून (Delhi) दुबईला जाणारे स्पाईसजेट विमानचे आज अचानक लँडिंग करण्यात आले. या विमानाचे लँडिंग पाकिस्तानमधील (Pakistan) कराची येथे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्पाईसजेटच्या इंडिकेटर लाईटमध्ये बिघाड झाल्यामुळे या विमानाचे लँडिंग केले आहे. स्पाईसजेटमध्ये १०० पेक्षा जास्त प्रवासी होते. या प्रवाशांना सुरक्षित कराचीमध्ये उतरले आहे.

आज ५ जुलै रोजी स्पाईसजेट B737 विमान (Flight) SG-11 हे दिल्ली-दुबई या विमानातील इंडीकेटर लाईटमध्ये बिघाड झाला असल्यामुळे कराचीच्या बाजूला वळवण्यात आले. विमानाचे कराचीमध्ये सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे. यादरम्यान कोणत्याही आपत्कालीन उतरण्यात आले नाही, तर विमानाने सामान्य लँडिंग केले.
 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply