मुंबई : सुपारीचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही : संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेनंतर (मंगळवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद पाेलीसांनी अटी शर्तींचे पालन न केल्याने विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी त्यात मोठी गोष्ट कोणती? अशी टिप्पणी केली आहे.

खासदार राऊत म्हणाले देशभरात असे गुन्हे दाखल झाले आहेत. कुणी भडकवणारे भाषण केले, कुणी चिथावणीखाेर लिहिले तर त्याच्यावर कारवाई केली जाते. त्यात मोठी गोष्ट कोणती महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे असेही राऊत यांनी नमूद केले.

राऊत म्हणाले बाहेरच्या राज्यातून लोक मुंबईत आणून येथे गडबड करायची असे नियाेजन केले जात आहे हे आमच्या लक्षात आले आहे. राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणा या गाेष्टी हाताळण्यास सक्षम आहेत असेही राऊत यांनी नमूद केले.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाेंग्याबाबत दिलेल्या अल्टिमेटमबद्दल राऊत यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी कसला अल्टिमेटम? असले इथे काही चालत नाही. महाराष्ट्रात अल्टिमेटमचे राजकारण चालणार नाही. येथे फक्त ठाकरे सरकारचा शब्द चालेल. इथं उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे सरकार आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे असा इशारा देखील राऊत यांनी दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply