मुंबई : शिवसेनेने जारी केलेला व्हीप बेकायदेशीर; एकनाथ शिंदेंचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देणारी भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रात शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी जारी केलेले व्हीप हे बेकायदेशीर असल्याचेत्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर, शिवसेना मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशातच, शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांना शेवटचा इशारा दिला आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईत या अन्यथा कारवाई अटळ असा इशारा या आमदारांना देण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक शिवसेनेकडून संबधित आमदारांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे, याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन आव्हान दिले आहे.

दुसरीकडे भाजपची आता सत्ता बदलासाठी धावपळ सुरू झाली आहे. राजकीय पंडितही वेगवेगळे अंदाज बाधत आहेत. मात्र एकवेळ समुद्राच्या खोलीचा अंदाज येईल पण राजकारणात पुढे काय घडेल हे घडल्याशिवाय लक्षात येत नाही, अशीच परिस्थिती सध्या राज्यातली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य काय? हे कळायला आणखी काहीशी वाट बघावी लागणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply