मुंबई - शिंदे सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

मुंबई - देशात मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती. आता आपण पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीच्या दिवशीच इंधनदर कपात करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने पेट्रोल डिझेल VAT कमी केला आहे. त्यामुळे आता पेट्रोल प्रती लिटर पाच रुपये डिझेल प्रतीलिटर तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *