मुंबई : राम नवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत वाद, दोन जखमी

मुंबईतील मानखुर्द परिसरात राम नवमी निमित्त आयोजित मिरवणुकीत वाद झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद झाल्याचे वृत्त असून परिसरात दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले आहे. मानखुर्दच्या पी एम जी पी परिसरात रविवारी राम नवमी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, दोन गटात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. घटनेनंतर पोलिस तसेच दंगल नियंत्रक पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. बाईक रॅली दरम्यान म्हाडा वसाहतीत दोन गटात वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात दोन जण जखमी झाले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *