मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपचा प्रयत्न : गृहमंत्री वळसे-पाटलांचा आरोप

मुंबई: शुक्रवारी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यापासून मातोश्री परिसरासह मुंबईत तणाव निर्माण झाला आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील शांततापूर्ण परिस्थिती राहण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन केलंय. काही लोक राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी प्रयत्न केला जातोय असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाजपवर केला आहे. 

दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, जबाबदार लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. तेढ वाढवायला नको. तसं वर्तन न ठेवता पब्लिसिटी करण्याचे काम केले जात आहे. हे पुढे केलेल प्यादे आहेत, सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा डाव दिसतो असा आरोप त्यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याबाबत गृहमंत्री म्हणाले की, पीएमच्या दौऱ्यासाठी पोलिस तयारी करत आहे. पीएम दौरा निर्विघ्न होईल. सर्व पक्षीय बैठक बोलवली आहे. यात भोंगे या विषयावर चर्चा होईल. राज्यात सर्वोच्य न्यायालयाने निर्णय दिला त्यावर चर्चा केला जाईल. कंबोज प्रकरणात ते म्हणाले की, मला या प्रकरणात माहिती नाही. मी माहिती अजून मुंबई पोलिसांकडून घेतली नाही.

राज्यात राष्ट्रपती राजवटीबाबत गृहमंत्री म्हणाले की, काही घटना घडल्या त्यावरून परिस्थती बिघडली अस म्हणतां येणार नाही. त्यांनी काही ठिकाणी उतरून वर्तन केले ते करायला नको. त्यांच्या कोणत्याही कुठल्या प्रश्नावर उत्तर द्यायचे नाही असं म्हणत त्यांनी राणा दाम्पत्यावर बोलण टाळलं. पुढे ते म्हणाले की, पोलिस आयुक्त आणि पोलीस कारवाई करतायत. मुंबई आणि राज्यात कायदा सुव्यवस्था उत्तम आहे. काही लोक राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाकडून राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी प्रयत्न केला जातोय पण तशी परिस्थिती नाही असंही गृहमंत्री म्हणाले. तसेच राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा म्हणायची होती तर त्यांनी अमरावतील त्यांच्या घरी किंवा त्यांच्या मुंबईच्या घरी म्हणायची होती. दुसऱ्याच्या घरात असं काहीतरी करणं हे जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केलाय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply