मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अ‍ॅक्शन मोडमध्ये; थेट मुख्य सचिवांना लिहलं पत्र

मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीनंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सरकारकडून 3 दिवसात मंजूर झालेल्या जीआरची माहिती राज्यपालांनी मागवली आहे. 22 ते 24 जून दरम्यानच्या जीआरची माहिती राज्यपालांनी मुख्य सचिवांकडून मागवली आहे. त्यामुळे आता मुख्य सचिव राज्यपालांना या जीआरबाबत नेमकी काय माहिती देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने 5 दिवसात तब्बल 280 जीआर काढले होते. याबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 48 तासातच 160 पेक्षा जास्त जीआर जारी करण्यात आले आहे.

विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढवणारा आहे. अडीच वर्षात निर्णयशून्य असलेले महाविकास आघाडी सरकार कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता देत आहे, त्यामुळे याकडे तातडीने लक्ष घालावे, अशी विनंती दरेकर यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केली होती.

दरम्यान, आता प्रवीण दरेकर यांनी लिहलेल्या पत्राची राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दखल घेतली आहे. यावर आता राज्यपालांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे. 22,23 आणि 24 जुलै या तीन दिवसात राज्य सराकराच्या वतीने घेण्यात आलेले निर्णय आणि सर्व जीआरसंबंधी सविस्तर माहिती देणारा अहवाल लवकरात सादर करावा, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply