मुंबई : मुंबईतील शाळांचे नामफलकही मराठीत: BMC ने काढले परिपत्रक

मुंबई : मुंबई आणि परिसरातील महापालिकेच्या शाळांसोबतच खाजगी व्यवस्थापानाच्या शाळा, इंटरनॅशनल शाळा आणि अनुदानित, विनाअनुदानित आदी सर्व शाळांचे नामफलकही आता मराठीतून (Marathi board on school) झळकणार आहेत. यासाठी लवकरच कार्यवाही सुरू केली जाणार असल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

राज्य सरकारने नुकत्याच संमत केलेल्या स्थानिक प्राधिकरणे राजभाषा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरातील राज्यातील दुकाने व आस्थापनांसोबतच आता शाळांचे नामफलकही मराठीतून लावण्यासाठी अंमलबजावणी केली जाणार आहे. तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठातही महाविद्यालये आणि विभागाची नावे ही मराठीतून लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी महापालिका शिक्षण विभागाने आज परिपत्रक जारी केले आहे.

मुंबई आणि परिसरातील सर्व प्रकारच्या शाळांची नामफलक ही मराठीतून लावण्यासाठीची कार्यवाही तातडीने सुरू केली जावी यासाठी युवासेनेच्या वतीने नुकतेच बृहन्मुंबई शिक्षण विभागाचे शिक्षणअधिकारी राजेश कंकाळ व उपशिक्षणाधिकारी राजू तडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. यासाठी साईनाथ दुर्गे, अॅड.श्री.संतोष धोत्रे आदींनी पाठपुरावा केला होता.

ज्या शाळा स्थानिक प्राधिकरणे राजभाषा विधेयकाचे उल्लंघन करतील, अथवा त्याची अंमलबजावणी करणार नाहीत, अशा शाळांवी शिक्षण हक्क कायदा २००९ (आर.टी.ई) अंतर्गत नमुना २ अन्वये मिळणारी प्रथम मान्यता देण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यात करण्यात आली होती. त्या मागणीवर बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आज परिपत्रक जारी करून सर्व शाळांचे नामफलक हे मराठीतून लावण्याचे आदेश दिले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply