मुंबई मनपा समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल, तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती?

मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला लवकरच होणार आहे. मुंबई महापालिकेतील चार महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल केले जात आहेत. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सदस्य आज सकाळी साडेअकरा वाजता हे अर्ज भरतील.

यामध्ये स्थायी समिती आणि शिक्षण समितीसाठी भाजपकडून अर्ज दाखल केले जाणार आहेत. शिक्षण समितीसाठी २६ सदस्य असून, भाजपच्या राजश्री शिरवाडकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. स्थायी समितीसाठी २७ सदस्य असून, या पदासाठी भाजपचे प्रभाकर शिंदे आणि मकरंद नार्वेकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

त्याचबरोबर बेस्ट समितीमध्ये १७ सदस्य असून, शिवसेना शिंदे गटाच्या तृष्णा विश्वासराव यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. सुधार समितीच्या अध्यक्षपदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या सर्व घडामोडींमुळे मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय आणि आर्थिक नियंत्रणाची सूत्रे कोणत्या राजकीय पक्षांकडे जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *