मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अडीच कोटींचे ड्रग्स ताब्यात!

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मे महिन्यात मुंबई आणि परिसरातून अडीच कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. मुंबई पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधी कक्षाने केलेल्या कारवाईत एकुण ६२ गुन्हे दाखल करण्यात आले असुन ७३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ८५ किलोचा २० लाख रुपये किमतीचा गांजा तसेच ३९ लाख रूपये किमतीची ३२० ग्रॅम हिरोईन आणि ९०९ ग्रॅम चरस ज्याची किंमत २५ लाख रुपये एवढी आहे. या व्यतिरिक्त पोलिसांच्या कारवाईत १ कोटी ३१ लाख किमतीचा ८७६ ग्रॅम एमडी तर ७ लाख रुपये किमतीचा २३ ग्रॅम कोकेन पकडले गेले आहे.

या व्यतिरिक्त ३६ लाख किमतीचे इतर अमली पदार्थ पोलिसांनी कारवाईत ताब्यात घेतले आहे. एकंदरीत मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मे महिन्यात मुंबईत अडीच कोटींचे ड्रग्स पकडण्यात यश आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply