मुंबई : नवनीत राणा, रवी राणांना मुंबई पोलिसांनी केली अटक

 मुंबई: खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबईच्या खार पोलिसांनी अटक केली आहे. चिथावणीखोर वक्तव्य आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ही अटकेची कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी, राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणलं. अटकेनंतर आता त्यांना आजची रात्र पोलीस ठाण्यातच काढावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच राणा दाम्पत्यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.

या सगळ्या घटनेनंतर खासदार नवनीत राणा यांनी व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया दिली. आज ज्या पद्धतीने आमच्या घरात पोलीस जबरदस्ती घुसले. कालपासून आम्ही आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी नोटीस दिली होती. त्यानुसार, आम्ही घराबाहेर पाऊल ठेवले नाही. पण आज पोलीस आमच्या घरात घुसले. पोलीस ठाण्यात आम्हाला नेत आहेत. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारायचा आहे, ज्या पद्धतीने आम्ही नियमांचे पालन केले, घराबाहेर पाऊल ठेवले नाही. पण आमच्यावर गुन्हा दाखल होत आहे. जबरदस्ती पोलीस आम्हाला पोलीस ठाण्यात नेत आहे. या पद्धतीची गुंडशाही आम्ही आजपर्यंत कधी पाहिली नाही. आमदार आणि खासदारांना जबरदस्ती वाहनात बसवून नेत आहेत. मी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांना विनंती करते की, आज तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी असताना, आमच्यासारख्यांना अशी वागणूक दिली जात आहे. तुमच्या मदतीची आम्हाला गरज आहे. आमच्यासारख्यांना न्याय मिळू शकत नसेल, तर भविष्यात कुणीही न्यायासाठी लढणारा राहणार नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply