मुंबई : धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवणारी ‘ती’ महिला अटकेत

मुंबई : एका महिलेने बलात्काराची तक्रार करण्याची धमकी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिली. तसेच त्यांच्या ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही महिला इंदूरची असून मुंबईतील पोलिस ठाण्यात महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील रेणू शर्मा या महिलेला इंदूर येथून अटक करण्यात आली. मुंबई पोलिस रेणू शर्माला मुंबईत दाखल करणार आहेत.

आरोपी महिलेने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती. पण, काही दिवसानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली. त्यानंतर महिलेने फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून बलात्काराची तक्रार देण्याची धमकी धनंजय मुंडेंना दिली. तसेच त्यांना ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी देखील केली. ५ कोटी रुपयांचे दुकान आणि महागडा मोबाईल द्यावा, असा तगादा आरोपी महिलेने मुंडेंकडे लावला. तसेच मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करून पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. याशिवाय रेणू शर्माने खोटी कागदपत्रे सोशल मीडियावर पोस्ट करून बदनामी करून त्यांच्या मंत्रीपद घालण्याचा धमकी त्याने दिली होती. तसं करायचा नसेल तर पाच कोटीचे घर आणि पाच कोटींची कंपना द्या, अशी मागणीही तिने केली होती. आरोपी महिलेविरोधात पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी देखील आरोप केले होते. मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर देखील मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. पण, मुंडे यांनी वेळीच स्पष्टीकरण देत त्या माझ्या पत्नी असल्याचं सांगितलं होतं.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *