मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्याबाहेरुन राज्यातील राजकारणाची सुत्र हलविणारे एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान या दोघांचा शपथविधी आज सायंकाळी ७ वाजता होणार असल्याची माहीती समोर येत आहे.

काही वेळापुर्वीच शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवास्थानी पोहचले असून फडणवीस यांच्या बंगल्यावरुन ते राजभवनावरती जाणार असल्याची माहिती मिळतं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आजचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जर आज या दोघांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर परवाच्या फ्लोर टेस्टसाठीचे पत्र राज्यपालांकडून विधीमंडळाकडे देण्यात येणार असल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून वेळेचे गणित जुळविण्याच प्रयत्न केला जात असल्याचं देखील बोललं जात आहे.

दरम्यान, काही वेळापुर्वी भाजपच्या कोअर कमिटीची एक बैठक पार पडली असून या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. एकनाथ शिंदे हे थेट गोव्याहून फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहचले.

दरम्यान, भाजपचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आजच शपथ घेणार का याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता लागून राहिली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply