मुंबई – गोवा महामार्गावर मुंबई सेंट्रल- महाड बस जळून खाक; प्रवासी सुखरुप

नवी मुंबई : मुंबई सेंट्रलहून महाडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक मुंबई - गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यच्या पुढे पेटली. ही गाेष्ट चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने सर्व (५२) प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. या घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित असून संपुर्ण बस मात्र जळून खाक झाली आहे. 

मुंबई सेंट्रल येथून महाडला (एमएच १४ बीटी २०५६) ही बस निघाली हाेती. या बसला आज (शुक्रवार) सकाळी सव्वा नऊ वाजता मुंबई - गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यच्या पुढे अचानक आग लागली. बसच्या समोरील बाजूकडून धूर आल्याने आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखत तात्कळ बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढले.
दरम्यान आग भडकल्याने प्रवाशांसह वाहकाचे सर्व सामान जाळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पाेहचून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले मात्र बस जळून खाक झाली हाेती. या अपघातामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. या महामार्गावर तात्पूरत्या स्वरुपात एकेरी वाहतूक सुरु केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply