मुंबई : गुणरत्न सदावर्तेंच्या घरी नोटा मोजण्याचं मशीन, पैशांतून कारही घेतली; सरकारी वकिलांचा दावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या घरावरील हल्ला प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांनी भडकविल्याचा आरोप असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरामध्ये छापेमारी झाली असता अनेक गोष्टींचा खुलासा झाल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गिरगाव कोर्टात दिली आहे.

एॅड गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी आज कोल्हापूर पोलिसांची एक टीम गिरगाव कोर्टात दाखल झाली आहे. यावेळी सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांना सदावर्ते यांची कोठडी मागितली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत कोर्टात युक्तीवाद करताना त्यांनी सदावर्तेंच्या घरात सापडलेल्या गोष्टींची माहिती कोर्टाला दिली.

अजित मगरे आणि संदीप गोडबोले यांनी संयुक्तपणे पवारांच्या घराची रेकी केली होती अशी माहिती आता समोर आली आहे. तसंच तपासात काही आर्थिक व्यवहारबद्दल माहिती समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात केलेल्या छापेमारीमध्ये नोट मोजायचे मशीन, संशयास्पद कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आली आहेत.तसंच सदावर्ते यांनी डेपो प्रमाणे व्हॉट्सॲप ग्रुप बनवले होते, ज्याद्वारे माहिती फॉरवर्ड केली जायची. शिवाय 85 लाख रुपये मशिनी द्वारे मोजले गेले असल्याची माहितीही सरकारी वकिलांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply