मुंबई : कोस्टल रोडला ‘कोस्टल वॉक’ची किनार

मुंबई : वरळी ते नरिमन पॉइंटपर्यंतच्या सागरी किनारी मार्गाचे बांधकाम ५० टक्के पूर्ण झाले असून नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. या मार्गामुळे वाहतूक सुसाट होणारच आहे, त्याचबरोबर मुंबईतील सर्वांत मोठ्या किनारी पदपथासह पिकनिक स्पॉटही तयार करण्यात येणार आहे. पालिका १२ हजार कोटी रुपयांचा खर्च करून हा १० कि.मी.चा मार्ग तयार करत आहे. यामुळे वरळी ते नरिमन पॉइंटपर्यंतचे अंतर १० ते १२ मिनिटांत कापता येईल. त्यासाठी १११ हेक्टर समुद्रात भराव टाकण्यात आला असून त्यातील ३६ टक्के हिस्सा हा नागरी सुविधांसाठी वापरला जाईल. वरळी-हाजीअली ते प्रियदर्शनी पार्क असा पदपथ तयार केला जात असून त्याचबरोबर सायकल ट्रॅक, खुले नाट्यगृह, उद्याने व खेळांची मैदाने, प्रसाधनगृहे इत्यादी बाबीही ‘कोस्टल रोड’सोबत विकसित करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘सागरी किनारा रस्ता’ प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चक्रधर कांडलकर यांनी दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गालगतचा मरीन ड्राईव्ह हा ३.५ कि.मी.चा सागरी पदपथ मुंबईतील सर्वांत मोठा सागरी पदपथ आहे; मात्र कोस्टल रोडचा पदपथ हा यापेक्षा दुप्पट लांबीचा ८.५ कि.मी. असेल. तसेच पदपथाची रुंदी तब्बल २० मीटर असेल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply