मुंबई कोरोनाच्या विळख्यात; आजची आकडेवारी धडकी भरवणारी

मुंबई : येथे कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ चौथ्या लाटेला आमंत्रण करणारी असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांची धास्ती वाढली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. आजही मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत कोरोनाचे नवे १७४५  रुग्ण आढळले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आज कोरोनाच्या १७४५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय.त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा १०७८०२२ वर पोहोचला आहे. तर आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना मृतांचा आकडा १९५७१ एवढा झाला आहे.

दरम्यान, मुंबईतील कोरोना बाधितांची आजपर्यंतची संख्या १०७८०२२ एवढी झाली आहे. तर कोरोनातून बरे झालेले रुग्णांची संख्या १०४८४०४ वर पोहोचली आहे. तसेच मुंबईतील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १००४७ झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply