मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार ; कंटेनरला आदळून भीषण अपघात

पालघर : मुंबई आमदाबाद महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार दिसून आला असून दोन मालवाहू वाहनांमध्ये भीषण अपघात झाल्याने घडली असून एक चालक गंभीर जखमी आहे. मेंढवण घाट येथे पहाटे 5 वाजल्याच्या सुमारास मुंबई दिशेने जाणारा टेम्पो क्रमांक GJ . 01.HT .7839 याने गुजरात वाहिनीवर येऊन मक्याचे पीठ असलेल्या ट्रक. क्रमांक KA .22.D 0323 यास ठोकर मारल्याने दोन्ही वाहनांनी पेट घेतलला. यामुळे गुजरात दिशेने जाणारी वाहतूक प्रभावित झाली होती.

बोईसर एमआयडीसी व पालघर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने आग विझवली. जखमी टेम्पो चालकास मनोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कुठलेही जीवितहानी झाली नसली तरीही दोन्ही ट्रक पूर्ण जळून खाक झाले आहे. काही काळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहिनीवरील वाहतूक विस्कळीत झाली असून लांबच लांब वाहणाच्या रांगा पाहायला मिळाल्या.आग आटोक्यात आली असून बाधित वाहने रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत करून घेत आहोत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply