मुंबईतल्या मित्तल इस्टेटमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी

मुंबईः मुंबईतल्या अंधेरी-कुर्ला रोडवरील मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. मागील दोन ते अडीच तासांपासून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.अंधेरीतल्या मित्तल इंटस्ट्रियल इस्टेटमध्ये अनेक गोदामं आहेत. याच गोदामांना दोन ते अडीच तासांपूर्वी आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केलं. आग एवढी भीषण आहे की १० ते १२ गाड्या घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

या गोदामांमध्ये अनेक कामगार होते, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरुप बाहेर काढलं आहे. आणखी काहीजण आतमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्याची मोहीम सुरु असून या घटनेमध्ये कसलीही जीवितहानी झालेली नाही. गोदामांमध्ये असलेला माल जळून खाक झाला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply