
राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं याच मुद्द्यावर शिवसेनेला लक्ष्य केलंय. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर यासंदर्भात मनसेनं पहिली प्रतिक्रिया नोंदवलीय.
इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत एमआयएम महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. “भाजपाचा पराभव करण्यासाठी एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम राहतील,” असं इम्तियाज जलील यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पुढील ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले आहे की, “आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास व्हावा यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या आहेत. तसेच एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती व्हावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगण्यात आलं आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत,” असंही इम्तियाज जलील म्हणाले आहेत.
एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर निशाणा साधलाय. ‘राज्याची शोभा होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे,’ असा टोला काळे यांनी लगावलाय. पुढे बोलताना त्यांनी, ‘त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे,’ असंही म्हटलंय.
सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपामध्ये चुरशीची लढत आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. शिवसेना व भाजपाला अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष व छोटय़ा पक्षांची गरज लागणार आहे. अपक्ष व छोटय़ा पक्षांचे २९ आमदार असून, ते कोणती भूमिका घेतात यावर शिवसेना व भाजपाचे भवितव्य अवलंबून आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने मतांचे नियोजन करताना परस्परांना फायदा होईल, अशी व्यवस्था केली आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांनी दुसऱ्या पसंतीची मते शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला द्यावीत, अशी सूचना करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांनी गुरुवारी सायंकाळी पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते कोणाला द्यायची याचे प्रशिक्षण आमदारांना देण्यात आले.
शिवसेना आणि भाजपामध्ये अतिरिक्त जागेवरून चुरस निर्माण झाली असतानाच, दुसरीकडे भाजपाने काँग्रेस उमेदवाराला पराभूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचा उमेदवार पराभूत होणे, हे भाजपासाठी अधिक फायद्याचे आहे. त्यातून राज्यसभेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊ शकेल. मात्र, बाहेरचा उमेदवार आणि आमदारांमधील नाराजी यातून काँग्रेसने खबरदारी घेतली आहे. नाराज आमदारांशी पक्षाच्या नेत्यांनी वैयक्तिक चर्चा केली आहे.
राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते. त्यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना आपल्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवून मतदान करावे लागते. आमदाराने पक्षादेश धुडकावल्यास त्या आमदाराच्या विरोधात पक्षाला पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई करता येते. अपक्षांना मात्र मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नसते. राज्यसभा निवडणुकीत आमदारांची मते बाद होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. हरयाणामध्ये काँग्रेसच्या १४ आमदारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या पेनाऐवजी वेगळय़ा शाईच्या पेनाचा वापर केल्याने ही मते बाद ठरली होती. गुजरातमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांनी मते भाजपाच्या नेत्यांना दाखविल्याने ती मते बाद ठरली होती. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मतदान कसे करायचे याचे प्रशिक्षण आपापल्या आमदारांना दिले आहे.
उमेदवार : प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजपा), इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजपा), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजपा)
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

