महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार…शरद पवार…; गाेविंदबागसमाेर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे हजाराे कार्यकर्ते जमले

बारामती : एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आज (मंगळवार) ज्येष्ठ नेते शरद पवार  यांच्या बारामतीतील  गाेविंदबाग निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे हजाराे कार्यकर्ते गाेविंदबाग निवासस्थानजीक जमले असून ते पवार यांच्या नावाचा जयघाेष करीत आहेत.

बारामती निरा रस्त्यावर चार ठिकाणी कसून तपासणी केली जात आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. या ठिकाणी काेणीही आंदाेलनास आले तर आम्ही त्यास उत्तर देऊ असे कार्यकर्ते सांगत आहेत.

महाराष्ट्रा बुलुंद आवाज शरद पवार..शरद पवार...सुप्रिया ताई आगे बढाे हम तुम्हारे साथ है अशा घाेषणा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गाेविंदबाग नजीकच्या परिसरात देताहेत. या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी बारामती शहर पाेलिसांनी माेठा बंदाेबस्त तैनात केला आहे. दरम्यान सदावर्ते हे तुरुंगात असल्याने आज येथील आंदाेलन हाेणार नाही अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *