फर्ज, रॉकी, बॉबी यांसारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्री अरुणा ईरानी या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिल्या आहेत. अभिनेते महमूद यांच्यासोबतच्या अफेअरमुळे तर कधी दिग्दर्शक कुकू कोहलीसोबतच्या लग्नामुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. अरुणा ईरानी यांनी बऱ्याच काळापर्यंत त्यांचं लग्न लपवून ठेवलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या अभिनेते महमूद यांच्यासोबतच्या रिलेशनशिपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. महमूद यांनी करिअरच्या सुरुवातीला माझी खूप मदत केली होती, परंतु नंतर हेच नातं माझ्यासाठी शोषण आणि वेदनेचं कारण बनलं होतं, असा धक्कादायक खुलासा अरुणा ईरानी यांनी केला.
‘झूम स्पॉटलाइट सेशन्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्या पुढे म्हणाल्या, “महमूदजींनी माझं उघड शोषण केलं होतं. त्यांचं वागणं बदलत होतं आणि आमचं नातं फारच गुंतागुंतीचं झालं होतं.” अरुणा यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली होती. जेव्हा महमूद यांच्याशी त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी अरुणा ईरानी यांना मोठी ऑफर दिली होती. “महमूदजींनी मला पहिल्यांदा काम दिलं होतं. हे नातं एका अर्थाने नाईलाज आणि उपकाराच्या आधारावर सुरू झालं होतं. सुरुवातीला हा सहयोग फायदेशीर होता, परंतु जसजसं अरुणा ईरानी म्हणून माझी वेगळी ओळख निर्माण होऊ लागली, तसतसे ते माझ्यापासून दूर गेले”, असं त्यांनी सांगितलं.
अरुणा ईरानी यांनी असाही खुलासा केला की महमूद यांनी त्यांना लग्नाचं आश्वासन दिलं होतं. “ते मला त्यांची तिसरी पत्नी बनवू इच्छित होते. परंतु तसं होऊ शकलं नाही. महमूद यांचं आधीच दोनदा लग्न झालं होतं आणि त्यांनी पत्नीने त्यांना माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. त्यांच्या कुटुंबाने त्यांना माझ्यासोबत काम करण्यापासून रोखलं होतं. ब्रेकअपनंतर मला कुठेच काम मिळत नव्हतं. आम्ही विवाहित आहोत, अशा अफवा त्याकाळी पसरल्या होत्या. यामुळे माझ्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचला होता आणि माझ्या करिअरवरही वाईट परिणाम झाला होता. महमूद यांनी माझं करिअर घडवलं आणि ते उद्ध्वस्तंही केलं”, अशा शब्दांत अरुणा ईरानी व्यक्त झाल्या.
मी महमूद यांना पूर्णपणे दोषी मानत नाही, कारण सुरुवातीला मलाही त्यांची गरज होती, परंतु नंतर हे नातं शोषणासारखं वाटू लागल्याचंही त्या पुढे म्हणाल्या.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel