“मंत्रीपदाचे काय करता? मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; शिंदे गटातील आमदाराचं विधान

शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत येऊन तीन महिन्यांच्यावर कालावधी झाला आहे. मात्र, या सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याचा चर्चा रंगू लागल्या आहेत. किमान दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात तरी आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी आशा आता या आमदारांना असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आमदारांच्या नाराजीबाबत शिंदे गटातील जळगावचे आमदार किशोर पाटील यांना विचारले असता, त्यांनी मंत्रीपदाचे काय करता? मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो, असं विधान केलं आहे.

“आमदार नाराज असल्याच्या बातम्या नेमक्या कुठून येतात हे मला माहिती नाही. मात्र, मी कधीही नाराज नव्हतो. या मंत्रीपदाचे काय करता? मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो. मी नक्कीच मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. मात्र मी नाराज नाही. जर मला मंत्रीपदाची संधी मिळाली तर मी निश्चितच या संधीचं सोनं करेन. राज्याच्या हिताचे निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न असेल”, अशी प्रतिक्रिया जळगावामधील शिंदे गटाचे आदमार किशोर पाटील यांनी दिली आहे.

“अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भाजपाने माघार घेण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला. एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाले असेल आणि त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य पोटनिवडणुकीला उभं राहत असेल, तर ती निवडणूक बिनविरोध करण्याचा आपला प्रयत्न असतो. ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती टीकवण्याचे काम भाजपाने केलं. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो” , असेही ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply