पुणे - पादचाऱ्यांची सोय म्हणून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पादचारी भुयारी मार्ग (Underground Route) बांधले, मात्र त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. कोथरूड, हडपसर, नगर रस्ता, शनिवारवाडा येथील भुयारी मार्ग तळीरामांचे अड्डेच बनले आहेत. बहुतांश ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य, साठलेले पाणी यांमुळे भुयारी मार्गांत दुर्गंधी निर्माण झाल्याने नागरिकांची, महिलांची इच्छा असूनही भुयारी मार्गांचा वापर करता येत नाही. भुयारी मार्गांची देखभाल व दुरुस्तीच्या नावाने क्षेत्रीय कार्यालये आणि प्रकल्प विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने या ‘अंधेर’नगरीला वाली कोण, असाच प्रश्न निर्माण झाला आहे.
जंगली महाराज रस्त्यावर भोसले भुयारी मार्ग आहे, मात्र तो तीन-चार वर्षांपासून बंद आहे. या परिसरात शाळा आहे, रोज हजारो विद्यार्थी जंगली महाराज रस्ता जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतात. हा भुयारी मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न प्रशासन करत असले तरी अद्यापही आतमध्ये प्रचंड घाण आहे, वीज पुरवठ्याची व्यवस्था नाही, तेथील पाणी उपसा करण्याच्या दोन मोटारी चोरीला गेल्या आहेत, मात्र त्याची पोलिसांकडे तक्रार केलेली नाही! शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय आणि प्रकल्प विभाग यांच्यात समन्वय नसल्याने हा चांगला भुयारी मार्ग बंद आहे.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून भुयारी मार्ग व पादचारी उड्डाणपुलांची देखभाल दुरुस्ती केली जाते. भुयारी मार्गांमध्ये वीज, स्वच्छता यांची कामे करून घेण्यास क्षेत्रीय कार्यालयांना आदेश दिले आहेत, ’’
महापालिकेने बांधलेले भुयारी मार्ग व उड्डाणपूल पादचाऱ्यांच्या नाही, तर वाहनांच्या सोईच्या दृष्टीने बांधले गेल्याने त्यांचा जास्त वापर होत नाही. तसेच जिने चढणे व उतरण्यास नागरिकांकडून कंटाळा केला जातो. काही अपवाद वगळता दुभाजकांमध्ये ठरावीक अंतरावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याची सुविधा असली पाहिजे.’’
शहरातील महत्त्वाचा आणि नागरिकांकडून सर्वाधिक वापरला जाणारा डेक्कन जिमखाना येथील आबासाहेब गरवारे पादचारी पूल १९८१पासून पुणेकरांच्या सेवेत आहे. तेथे उत्तम पद्धतीने महापालिकेने देखभाल दुरुस्ती केली आहे, सुशोभीकरण केले आहे, सुरक्षेसासाठी सीसीटीव्ही आहेत. याच पद्धतीने एरंडवणे येथील स्वरतीर्थ सुधीर फडके भुयारी मार्ग २००४ मध्ये बांधला आहे. तेथेही स्वच्छता, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक अशी व्यवस्था आहे. भुयारी मार्गांचा उत्तम नमुना म्हणून यांची दखल घ्यावी लागेल.
शनिवारवाड्यासमोरील भुयारी मार्गाचा पादचाऱ्यांनी वापर करणे आवश्यक आहे. मात्र, या भुयारीमार्गात तळीरामांचा अड्डा झाल्याचे दिसून येत आहे. शनिवारवाडा समोरील शिवाजी महाराज रस्ता आणि बाजीराव रस्त्याखालून मोठा दर्गा रस्त्यावरून या भुयारी मार्गातून नव सुनीता अपार्टमेंटसमोरून कसबा पेठकडे जाता येते.
- गुटखा खाऊन भिंतींवर थुंकल्याने दुर्गंधी
- मोठ्या प्रमाणात अस्वच्छता
- दुपारच्या वेळी भुयारात दुतर्फा झोपलेले नागरिक
- तळीरामांचा अड्डा
नशा करून वाटेल तसे तळीराम मध्येच झोपत असल्याने महिलांना या मार्गातून चालणे कठीण वाटते. या भुयारात असलेले विश्रामबागवाडा विभागीय कार्यालयाचे कीटक प्रतिबंधक विभागाचे छोटे कार्यालय असल्याचा येथे फलक लावला आहे. ते जर सुरू केले तर भुयारी मार्ग स्वच्छ राहील.
पुणे-सोलापूर महामार्गावर वैदूवाडी येथील पादचारी भुयारी मार्गात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. सन २००५-०६ च्या दरम्यान प्रवासी आणि पादचाऱ्यांना बस थांब्यावर जाण्यासाठी व रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी भुयारी मार्ग करण्यात आला होता. मात्र या ठिकाणी दररोज साफसफाई केली जात नाही, घाण व दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर आहे, यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
- गर्दुल्ले व मद्यपी खुलेआम दारू पीत बसलेले असतात.
- सांडपाणी जमा होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव आहेत.
- विद्युतव्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळेस महिलांसाठी असुरक्षित
- नियमीत स्वच्छतेचा अभाव
रात्रीच्या वेळी तर नाहीच नाही, पण दिवसादेखील या पादचारी मार्गाने प्रवास करणे अवघड झाले आहे. महापालिकेने नियमितपणे येथे साफसफाई करून येथे घाण करणाऱ्यांवर कारवाई करावी.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


