भीमा नदी पात्रात टप्पाटप्याने चार मृतदेह आढळल्याने खळबळ

केडगाव, जि.पुणे - पारगाव (ता. दौंड) येथे भीमा नदी पात्रात टप्पाटप्याने चार मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस कसून तपास करत आहे. हे मृतदेह एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या पाच दिवसात हे चार मृतदेह आढळून आले आहेत.

बुधवारी (ता. १८) मच्छीमारांना सर्वप्रथम एका महिलेचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर रविवारपर्यंत (ता. २२) एक महिला व दोन पुरूषांचे मृतदेह आढळून आले आहेत. सर्व मृतदेह अनोळखी असून त्यांची ओळख पटविण्याचे काम चालू आहे. मृत व्यक्ती या ४० ते ५० वयोगटातील आहेत. या घटनेत घातपात असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे. दरम्यान पोलिस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. पोलिस अधीक्षक गोयल यांनी नदीपात्राची पाहणी करत अधिका-यांना तपासाबाबत सुचना दिल्या आहेत. पोलिसांनी मृतदेहांची नावे सांगण्यास नकार दिला आहे.

आणखी मृतदेह असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पुणे महानगर पालिकेचे शोध पथक पारगाव येथे दाखल झाले आहे. त्यांच्या नदीपात्रात मृतदेहांचा शोध घेतला जात आहे.याबाबत पोलिस निरीक्षक शेडगे म्हणाले, या घटनेत घातपाताची शक्यता वाटत नाही. तरीपण त्यादृष्टीने तपास चालू आहे. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिका-यांनी दिला आहे. एका महिलेकडे मोबाईल व सोने खरेदीची पावती सापडली आहे. त्यावरून पुढे तपास चालू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply