भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार! आज ‘तारागिरी’ युद्धनौकेचे जलावतरण

मुंबई : भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. भारतीय नौदलाच्या सेवेत आणखी युद्धनौका दाखल होणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे प्रकल्प १७ ए मधील तिसरी युद्धनौका ‘तारागिरी’चे आज जलावतरण करण्यात येणार आहे.

तारागिरी युद्धनौकेचे आज जलावतरण

तारगिरी प्रकल्पाची सुरुवात १० स्प्टेंबर २०२० मध्ये करण्यात आली होती. या युद्धनौकेचे आरेखन भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या नौदल डिझाईन ब्युरोने केले आहे. तर येत्या ऑगस्ट २०२५ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. याआधीच माझगाव डॉक लिमिटेडने उदयगिरी आणि सूरत या युद्धनौकांचे नुकतेच लॉंचिंग केले होते. संपूर्ण तारागिरीचे काम हे इंटिग्रेटेड कंस्ट्रक्शन मेथडॉलॉजीने करण्यात येत आहे. त्यामध्ये ब्लॉकची निर्मिती विविध ठिकाणी करूनच माझगाव डॉक लिमिटेड येथे हे सुटे भाग जोडण्यात येणार आहेत. जवळपास ३५१० टनची युद्धनौका नौदलाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईनच्या माध्यमातून या युद्धनौकेचे डिझाईन करण्यात आले आहे.

‘तारागिरी’ युद्धनौकेची वैशिष्ट्ये

एमडीएलच्या माध्यमातून डिटेल डिझाईन आणि युद्धनौका बांधणीचे काम हे वॉरशीप ओव्हरसिईंग टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन गॅस टर्बाईन्स तसेच २ डिझेल इंजिनच्या माध्यमातून २८ नॉटिकल माईल्सचा वेग गाठणे हे युद्धनौकेला शक्य होणार आहे. यासाठी कार्बन मायक्रो अलॉय स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तसेच युद्धनौकेसाठीची शस्त्रे, सेन्सर, एडव्हान्स एक्शन इन्फॉर्मेशन सिस्टिमचा वापरही करण्यात आला आहे. सरफेस टू सरफेस अशा मिसाईल सिस्टिमचाही वापर युद्धनौकेसाठी करण्यात आला आहे. गनफायर सपोर्टही युद्धनौकेसाठी देण्यात आला आहे. तसेच रॉकेट लॉंचरचे फीचरही समाविष्ट करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply