
बर्मिगहॅम : बर्मिगहॅम शहराचा समृद्ध संगीत वारसा आणि सर्वसमावेशकता याचे दर्शन घडवणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळय़ासह गुरुवारी मध्यरात्री २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला.
अलेक्झांडर स्टेडियममध्ये झालेल्या या सोहळय़ाची ड्रमर अब्राहम पॅडी टेटेच्या सादरीकरणाने सुरुवात झाली. मग विविध सादरीकरणांच्या माध्यमातून बर्मिगहॅम शहराची विविधता दर्शवण्याचा प्रयत्न झाला. यात भारतीय शास्त्रीय गायिका आणि संगीतकार रंजना घटक यांच्या सादरीकरणाचाही समावेश होता. करोनानंतर कोणत्याही कठोर निर्बंविना होणारी ही पहिलीच जागतिक दर्जाची क्रीडा स्पर्धा असल्याने उद्घाटन सोहळय़ाला चाहतेही मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.
त्यानंतर सहभागी राष्ट्रांच्या संचलनाला सुरुवात झाली. दोन ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी ध्वजवाहकाच्या भूमिकेत भारताच्या पथकाचे नेतृत्व केले. ब्रिटनच्या राष्ट्रगीतासह या अडीच तास चाललेल्या सोहळय़ाची सांगता झाली.
लवलिनाला क्रीडा नगरी गाठण्यात अडचणी
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोहेनने गुरुवारी उद्घाटन सोहळा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. शनिवारी पहिली लढत खेळायची असल्याने शुक्रवारी सकाळी लवकर सराव करण्याच्या उद्देशाने लवलिनासह भारताचा अन्य बॉक्सिंगपटू मुहम्मद हुसामुद्दीनने अलेक्झांडर स्टेडियममध्ये झालेल्या उद्घाटन सोहळय़ातून बाहेर पडून क्रीडा नगरीत परतायचे ठरवले. मात्र, त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. भारतीय पथकाला तीन गाडय़ा देण्यात आल्या आहेत. परंतु उद्घाटन सोहळा रात्री उशिराने असल्यामुळे या गाडय़ांच्या चालकांच्या कामाची वेळ संपली होती. भारतीय खेळाडू बसमधून अलेक्झांडर स्टेडियममध्ये गेले होते. त्यामुळे परत येण्यासाठी लवलिना आणि मुहम्मद यांना वाहन उपलब्ध नव्हते. अखेर त्यांनी मिळेल त्या बसमधून परत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही बाब भारतीय बॉक्सिंग महासंघाचे उपाध्यक्ष राजेश भंडारी यांना फारशी आवडलेली नाही.
हॉकी : भारताचा घानावर विजय
सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारताच्या महिला हॉकी संघाने शुक्रवारी अ-गटात घानावर ५-० असा विजय मिळवला. या सामन्यात भारताने चारही सत्रांत वर्चस्व गाजवले. गुर्जित कौरने (तिसऱ्या मिनिटाला, ३९ व्या मि.) दोन गोल केले, तर नेहा गोयल (२८ व्या मि.), संगीता कुमारी (३६व्या मि.) आणि सलिमा टेटे (५६ व्या मि.) यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
बॅडिमटन :भारताची पाकिस्तानवर सरशी
भारताने सांघिक बॅडिमटन प्रकारात पाकिस्तानवर ३-० अशी आरामात सरशी साधली. बी. सुमीत रेड्डी आणि मॅचिमँडो पोनप्पा जोडीने मिश्र दुहेरीत मुहम्मद भट्टी आणि घाझाला सिद्धिकी जोडीला २१-९, २१-१२ असे हरवले. मग पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतने मुराद अलीचा २१-७, २१-१२ असा फडशा पाडला. तिसऱ्या महिला एकेरीच्या लढतीत पीव्ही सिंधूने महूर शेहझादचा २१-७, २१-६ असा पराभव केला.
टेबल टेनिस : भारताची विजयी सलामी
मनिका बत्राच्या नेतृत्वाखालील भारताच्या महिला टेबल टेनिस संघाने शुक्रवारी गट-२ मध्ये दक्षिण आफ्रिकेला ३-० असे हरवून विजयी सलामी नोंदवली. दुहेरीत श्रीजा अकुला आणि रीथ टेनिसन जोडीने लैला एडवर्डस आणि डॅनिशा पटेल जोडीला ११-७, ११-७, ११-५ असे नमवले. पहिल्या एकेरी लढतीत गतविजेत्या मनिकाने मुशफिकर कलामचे आव्हान ११-५, ११-३, ११-२ असे मोडीत काढले. दुसऱ्या एकेरीत श्रीजाने डॅनिशाचा ११-५, ११-३, ११-६ असा पाडाव केला.
’ भारताच्या पुरुष संघाने बार्बाडोसला ३-० असे पराभूत केले
बॉक्सिंग : शिवाचा एकतर्फी विजय
आघाडीचा बॉक्सिंगपटू शिवा थापाने राष्ट्रकुल मोहिमेला दमदार प्रारंभ करताना ६३.५ किला वजनी गटात पाकिस्तानच्या सुलेमान बालोचवर ५-० असा एकतर्फी विजय मिळवला.
जलतरण ’ पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात श्रीहरी नटराजने ५४.६८ सेकंद वेळेसह तिसरा क्रमांक मिळवला आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
’ पुरुषांच्या ५० मीटर बटरफ्लाय प्रकारातील सहाव्या शर्यतीत साजन प्रकाशने २५.०१ सेकंदांसह आठवे स्थान मिळवल्याने उपांत्य फेरी गाठू शकला नाही.
’ पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात कुशाग्र रावतने ३:५७.४५ सेकंद वेळ नोंदवत अखेरचा क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
सायकलिंग ’ पुरुषांच्या सांघिक स्प्रिंट पात्रता स्पर्धेत भारतीय संघाला सहाव्या क्रमांकावर (४४.७०२) समाधान मानावे लागल्याने पदकफेरी गाठता आली नाही.
’ महिलांच्या सांघिक स्प्रिंट पात्रता स्पर्धेत भारतीय संघाला सातव्या क्रमांकावर (वेळ ५१.४३३) समाधान मानावे लागल्याने आगेकूच करता आली नाही.
ट्रायथलॉन ’ पुरुषांच्या वैयक्तिक (स्प्रिंट) शर्यतीत भारताच्या आदर्श नायर (१:००:३८) आणि विश्वनाथ यादव (१:०२:५२) यांना अनुक्रमे ३०व्या आणि ३३व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
लॉन टेनिस ’ पुरुषांच्या तिहेरी प्रकारातील दुसऱ्या फेरीत भारताने स्कॉटलंडविरुद्ध १२-१९ असा पराभव पत्करला.
’ महिला एकेरीत तानिया चौधरीने डाफणे आर्थर-अलमोंडकडून २०-२१ असा पराभव पत्करला.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

