राजस्थानमध्ये शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. जयपूरच्या चाकसू परिसरातील या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्ग-52 वरील तिग्रिया वळणाजवळ पहाटे 5:30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेतील मृत प्रवासी हे मध्य प्रदेशातील जबलपूरचे रहिवासी होते आणि ते धार्मिक यात्रेला गेले होते अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
5 जणांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, या भाविकांनी उज्जैनमधील महाकालेश्वर महादेवाचे दर्शन घेतले आणि नंतर ते खाटूश्यामजी येथे जात होती. त्यावेळी चालकाला झोप लागली आणि कार समोर जात असलेल्या ट्रेलरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. या अपघातात एका महिलेसह 5 जणांचा मृत्यू झाला. यातील 4 जण जागीच मरण पावले होते, तर एका तरुणाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच मरण पावला. रेश्मा श्रीवास्तव, पियुष राय, राहुल रजक, शानू आणि चालक अनुराग अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.
वाहतूक विस्कळीत
या अपघातामुळे कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्ग-52 वरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि वाहतूक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या मदतीने खराब झालेली कार रस्त्यावरून दूर केली. त्यानंतर काही वेळानंतर वाहतूक पूर्ववत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
ते दोन दिवसांपूर्वी दर्शनासाठी निघाले होते
पोलिसांनी या अपघाताबाबत बोलताना सांगितले की, अपघातातील सर्व मृत लोक दोन दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी उज्जैनला निघाले होते. त्यांनी 13 फेब्रुवारी रोजी महाकालचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते खाटूश्यामजीकडे निघाले होते. मात्र वाटेत हा दुर्दैवी अपघात झाला आणि यात सर्वांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातातील मृतांचे मृतदेह चाक्सू उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात हा अपघात चालकाला झोप लागल्याने घडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता पोलिसांनी कसून तपासाला सुरूवात केली आहे. या अपघातासाठी इतर काही कारण आहे का हे पोलीसांकडून तपासले जात आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

