बीड: जिल्हा परिषदेच्या 1 हजार 72 शिक्षकांच्या कागदपत्रांची होणार पडताळणी

बीड: बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने, आज एकाच दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तब्बल 1 हजार 72 शिक्षकांची कागदपत्रे पडताळणी करुन सुनावणी घेतली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. 2014 साली देण्यात आलेली दर्जावाढ रद्द करून, पुन्हा प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अजित पवार यांनी 1 हजार 72 प्राथमिक पदवीधर शिक्षकांची अर्ज सादर करण्यासाठी सुनावणी ठेवली आहे.

मात्र, एका दिवसात सर्व कागदपत्रे सादर कशी करावीत? असा प्रश्‍न शिक्षकांना पडला असून शिक्षकांची मोठी तारांबळ उडाली आहे. प्राथमिक शिक्षकांना दर्जा वाढ संदर्भातील आक्षेप आणि त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी या सुनावणी घेतल्या जात आहेत. न्यायालयाच्या (court) आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने ही प्रक्रिया पार पडत असल्याची माहिती, प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply