बिटकॉईन प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून चौकशी

पुणे : बिटकॉईन प्रकरणामध्ये तत्कालीन पोलिस उपायुक्तांची सखोल चौकशी झाल्यानंतर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. संबंधित प्रकरणामध्ये सुरुवातीला तपास अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या या पोलिस अधिकाऱ्यांची आत्तापर्यंत दोनदा चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, बिटकॉईन प्रकरणाच्या गुन्ह्याची संपुर्ण माहिती सक्तवसुली संचालनालयाने दोन दिवसांपुर्वी घेतली आहे.

बिटकॉईनमध्ये गुंतवणुक केल्यास लाखो रुपयांचा फायदा होईल, असे आमिष दाखवून नागरीकांची फसवणूक केल्याप्रकरणी 2018 मध्ये दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. संबंधीत गुन्ह्यामध्ये पोलिसांनी भारद्वाज बंधुंसह 17 जणांना अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी सायबरतज्ज्ञ म्हणून पुढे आलेल्या ग्लोबल ब्लॉकचेन फाऊंडेशनचा पंकज घोडे व के.पी.एम.जीचा रविंद्र पाटील यांनीच पोलिसांची फसवणूक केल्याचे प्रकर पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

पोलिसांनी बिटकॉईन फसणुक प्रकरणातील आरोपींकडून जप्त केलेला महत्वपुर्ण डेटा विश्वासाने पाटील व घोडे यांना दिला होता.पाटीलने त्याच्या ई-वॉलेटमध्ये 60 पेक्षा जास्त बिटकॉईन वर्ग केले, तर घोडे याने अधिकाऱ्यांची दिशाभुल केली. दोघांनीही त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन बिटकॉईन स्वतःच्या खात्यामध्ये वर्ग केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले होते. दरम्यान, त्यांनी आरोपींच्या वॉलेटमधील ब्लॉकचेनचे स्क्रीनशॉट बनावटीकरण केले. हेच बनावट स्क्रीनशॉटच्या खरे असल्याचे भासवून तपासासाठी सादर केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. दरम्यान, मागील महिन्यात तत्कालीन पोलिस उपायुक्तांची आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी केली होती.

त्यानंतर बिटकॉईन फसवणुकीच्या प्रारंभीच्या तपास अधिकाऱ्यांनी घोडे व पाटील यांच्यासमवेत काम केले होते. त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, संबंधित गुन्ह्यात मनीलॉंड्रींग झाल्याचा पुणे पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने पुणे पोलिस तपास करीत आहेत. त्यासाठी लेखापरीक्षक नेमण्याची प्रक्रियादेखील सुरु केली आहे. त्यातच दोन दिवसांपुर्वी "ईडी'ने बिटकॉईनच्या गुन्ह्यांची संपुर्ण माहिती पोलिसांकडून घेतली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply