बिटकॉईन केस या प्रकरणात माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांचा जामीन फेटाळला

पुणे - बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) (Bitcoin) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात (Fraud Case) अटकेत असलेले माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील  यांचा जामीन अर्ज (Bail Form) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला. (Reject) त्यामुळे पाटील यांनी आता जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

या प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी नेमलेला सायबर तज्ञ पंकज प्रकाश घोडे (वय ३८, रा. ताडीवाला रोड) आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (वय ४५, रा. बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनी या प्रकरणातील डिजिटल डेटाचा गैरवापर केला आहे, असे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे. दरम्यान हा गुन्हा सत्र न्यायालयाकडून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग झाल्यानंतर पाटील यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी विरोध केला. आरोपींच्या वॉलेटचे पासवर्ड अद्याप मिळालेले नाहीत. तसेच गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला नाही. इतर आरोपींचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे पाटील याला जामीन झाल्यास तपासात अडथळा येवू शकतो, असा युक्तिवाद ॲड. जाधव यांनी केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply