बांधकाम परवानगी आणखी ३ महिने ऑफलाइनच; महापालिकेला द्यावे लागणार हमीपत्र

औरंगाबाद : शहरातील मालमत्ताधारकांना आणखी तीन महिने ऑफलाइन बांधकाम परवानगी मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेला मात्र शासनाला हमीपत्र द्यावे लागणार आहे. हमीपत्र देणाऱ्या महापालिकांना ३० जूनपर्यंत ऑफलाइन बांधकाम परवानगी देता येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. बांधकाम परवानगी घेतना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे राज्य शासनाने ऑनलाइन पद्धतीने बांधकाम परवानगी देण्याची प्रक्रिया राबविण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार एक ऑक्टोबर २०२१ पासून ऑनलाइन पद्धतीने बांधकाम परवानगी सुरू करण्यात आली. मात्र ही प्रक्रिया राबवताना देखील अडचणी कमी झालेल्या नाहीत. म्हणून काही काळ ऑफलाईन व ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे बांधकाम परवानगी दिली जात होती.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply