पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वा. सावरकरांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक; राहुल गांधी विरोधात घोषणाबाजी

पुणे : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वा.सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यभरात भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह कार्यकर्त्यांकडून सारसबाग येथील स्वा. सावरकरांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक घालण्यात आला. यावेळी राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

या घडामोडी घडत असताना,पुण्यातील सारसबाग येथील स्वा.सावरकरांच्या पुतळ्याच्या परिसरात युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी माफीवीर मजकूर असलेला फ्लेक्स लावला. त्यानंतर पुण्यातील काँग्रेस भवन येथे घुसून भिंतीवर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ‘माफीवीर जवाहरलाल नेहरू’ अशा मजकुराचे स्टीकर लावले. तर राहुल गांधी यांच्या फोटोला काळ फासून निषेध नोंदविला. त्याच दरम्यान भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि माजी नगरसेवक धीरज घाटे यांनी सारसबाग येथील स्वा.सावरकरांच्या पुतळ्याच्या परिसरात युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी ‘माफीवीर’ मजकूर असलेला फ्लेक्स लावणार्‍या विरोधात स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून सबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की, राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्या बदल जे विधान केल आहे.ते निषेधार्थ आहे.तसेच आम्ही ठिकठिकाणी आंदोलन करून सडक्या डोक्याच्या राहुल गांधी चा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply