पुण्यात टोळक्याने ३ तरुणांवर केले शस्त्राने वार, मध्यरात्री घडली थरारक घटना

पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेला किरकोळ वाद विकोपाला गेला आहे. या वादातून १८ ते २० जणांच्या टोळक्यानं शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील तीन तरुणांना बेदम मारहाण केली आहे. यावेळी पूर्ण तयारीत आलेल्या आरोपींनी धारदार शस्त्राने तिघांवर वार केले आहे. या हल्ल्यात तिन्ही तरुण जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री ही थरारक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी टोळक्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

हर्षद शांताराम शेटे (वय २१), त्याचा भाऊ विशाल (वय २५ दोघे रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत, शिवाजीनगर) आणि त्यांचा मित्र संकल्प मोरे (वय २४) अशी हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावं आहेत. हर्षदने याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात हर्षद, विशाल आणि संकल्प यांचा दुचाकींवरील दोघांबरोबर किरकोळ वाद झाला होता. यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास १८ ते २० जण शिवाजीनगर पोलीस वसाहती समोरील रस्त्यावर आले. टोळक्यातील काहीजणांकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. टोळक्याने दहशत माजवून हर्षद, विशाल, संकल्प यांच्यावर शस्त्राने वार केले.

हल्ला केल्यानंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी जखमी तरुण हर्षद शेटे यानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैरव शेळके करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply