पुण्यात अग्नितांडव! मंगळवार पेठेत दुकांनाना मोठी आग; 8 अग्निबंब घटनास्थळी

 पुण्यातून आगीचं मोठं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवार पेठ असलेले या जुना बाजारातील वस्तूंच्या दुकानांना मोठी आग लागली आहे. बुधवारी सकाळी बाजारातील काही दुकानांना अचानक आग लागल्याची घटना घडली. दुकानांना आग लागल्यानंतर परिसरात एकच धावाधाव झाली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात बुधवारी सकाळी जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना मोठी आग लागल्याची घटना घडली. मंगळवार पेठ असलेले या जुना बाजारमध्ये अनेक वस्तूंची दुकान आहेत. यातील अनेक दुकानांना आज सकाळी अचानक आग लागली. आगीची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मंगळवार पेठेतील या जुना बाजारात वायरिंग, इलेक्ट्रिकल, लाकडी फर्निचर अशी दुकानं आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या आगीत कोणी ही जखमी झालेले नाही. मात्र, या आगीत ७ ते ८ दुकानांना मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून मोठ्या शर्थीने आग विझविण्याचे काम सुरू आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली होती याची पूर्तता झालेली नाही.

मंगळवार पेठेतील या जुना बाजारातील बुधवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर परिसरात एकच धावाधाव झाली. त्यानंतर परिसरातील लोकांनी अग्मिशमन दलाला आगीच्या घटनेची माहिती दिली.

आगीच्या घटनेची माहिती सकाळी सात वाजून अडतीस मिनिटाला कळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दलाचे आठ अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनी सकाळी आठ वाजून चोवीस मिनिटाला आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply