पुण्यातील चांदनी चौकाजवळ बसला भीषण आग; अग्निशमन दलाची २ वाहनं घटनास्थळी सर्व प्रवाशी सुखरूप

कोथरूड : चांदणी चौक येथे भुगाव रोड वर सायंकाळी 7-50 च्या सुमारास मार्केट यार्ड वरून पौडच्या दिशेने निघालेल्या पीएमपीएल बसला आग लागली. वाहकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला घेत सर्व प्रवाशांना खाली उतरवले.

झिनिया सोसायटीतील मंगेश नारखेडकर म्हणाले की, आगीचे लोट लांबून ही दिसत होते. काहीतरी भयानक घडले असावे या धास्तीने लोक हळहळ करत होते. अग्निशमन दलाला फोन लावल्यावर दोन बंब घटनास्थळी आले व आग विझवली.

अग्निशमन दलाचे अधिकारी निलेश महाजन म्हणाले की, सीएनजी बसच्या इंजिन मधून धुर निघत असल्याचे लक्षात येताच ड्रायव्हरने बस मधील अग्निशमन उपकरण वापरून पाहिले पण त्याला मर्यादा होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबाच्या मदतीने बसची आग विझवली.

बावधन वाहतूक पोलिस निरिक्षक राम राजमाने यांनी सांगितले की, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आग कशामुळे लागली है स्पष्ट झालेले नाही. वाहतूक सुरळीत करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले.

हेल्प रायडर्स ग्रुपचे प्रशांत कनोजिया म्हणाले की, चांदणीचौक येथील वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत आग लागलेली सीएनजी बस मुंबई रस्त्यावर असती तर काय घडले असते? सुदैवाने भूगाव रस्त्यावर वाहनांची संख्या तुलनेने कमी होती म्हणून मोठी दुर्घटना टळली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply