पुणे : ‘हायजिया’ प्रकल्पाद्वारे नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण आणले जाणार

पुणे : सांडपाण्यातून नदीमध्ये जाणाऱ्‍या घनकचऱ्‍याला प्रतिबंध करण्यासाठी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनने, इमरिस, पर्सिस्टंट सिस्टीम, पुणे महानगरपालिका आणि वर्टेक्स प्रा. लि.च्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर ‘हायजिआ’ प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत २०० किलोहून अधिक घनकचरा नदीमध्ये जाण्यापासून यशस्वीरीत्या प्रतिबंधित करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनतर्फे देण्यात आली आहे.

याबाबत फाउंडेशनचे कार्यकारी संचालक तन्वीर इनामदार म्हणाले, ‘‘दरवर्षी पुण्यामध्ये सखल भागात मुसळधार पाऊस येतो. दरम्यान सांडपाणी वाहिनी मध्ये मोठ्या प्रमाणात साठणाऱ्या घनकचऱ्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. शहरांमध्ये सांडपाणी वाहिनी तुंबून पूर येऊ नये तसेच घनकचरा नदीमध्ये जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी ‘हायजिआ’ प्रकल्प करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया येथील क्विनाना या शहराने सांडपाणी वाहिनीमधून कचऱ्याचा योग्य निचरा होण्यासाठी एक सोपा आणि किफायतशीर उपाय तयार केला आहे. त्याच धर्तीवर आधारित एक प्रकल्प पुण्यामध्ये करण्यात आला आहे. ‘हायजिया’ प्रकल्पाद्वारे मुळा आणि मुठा नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण आणले जाणार आहे. सध्या ओंकारेश्वर पूल आणि हडपसरच्या वैदूवाडी झोपडपट्टी परिसरात प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प उभारण्यात आला आहे.’’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply