पुणे : ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांच्या अडचणींमध्ये वाढ? अनेक संस्थांनी पाठवल्या नोटीसा

पुणे : ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवरुनसुद्धा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटात चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत लढणारे सरदार बांदल, सरदार पासलकर यांचे वंशज तसेच विविध संघटनांच्यावतीने चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अभिजीत देशपांडे आणि एका मनोरंजन वाहिनीचे निर्माते यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.

या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या प्रसंगांबाबत सात दिवसांच्या आत पुरावे द्यावेत. तसेच लेखी खुलासा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा आणि अस्मिता आहेत. चित्रपट स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. याबाबत योग्य आणि समाधानकारक खुलासा न झाल्यास चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे, असे ॲड. विकास शिंदे यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply