पुणे : हडपसर येथील बंद असलेला उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला

हडपसर : गेली महिनाभरापासून दुरूस्तीच्या कामासाठी वाहतुकीला बंद असलेला हडपसर येथील उड्डाणपूल पुण्याकडील एका बाजूने अखेर आज अडीच वाजता सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला असून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुलाच्या बेअरिंग्ज झिजल्याने वाहतुकीवेळी वाहनांना हदरे बसत होते. त्याच्या दुरूस्तीसाठी गेली महिनाभरापासून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. नुकत्याच नवीन बेअरिंग बसवून पुण्याहून सोलापूर व सासवडकडे जाणारा उड्डाणपूल दुरुस्त करण्यात आला आहे. सध्या हा मार्ग केवळ हलक्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, कार्यकारी अभियंता इंद्रभान रणदिवे आदींच्या उपस्थितीत उड्डाणपुलावरून दुपारी वाहतूक सुरू करण्यात आली. पुण्याकडील बाजूने उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यामुळे दररोज होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. पुढील काही दिवसांत जड वाहतुकही पुलावरून सुरू करण्यात येणार आहे. सोलापूरच्या बाजूने शहरात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या एका खांबाच्या दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. येत्या काही दिवसांत त्याही बाजूने वाहतूक सुरू होईल, असे मुख्य अभियंता बोनाला यांनी यावेळी सांगितले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply