पुणे : स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा भोवला; तीन मुकादमांचे निलंबन

स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा केल्याने तीन मुकादमांना निलंबित करण्यात आले आहे. तर चौघांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दरम्यान, परिसराची स्वच्छता योग्य प्रकारे होत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

शहराच्या काही भागातील कचरा वेळेवर आणि योग्य प्रकारे उचलला जात नसल्याने शहरात कचऱ्याचे ढीग लागत आहेत. त्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी दिले होते. त्यानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जात आहे. या पाहणी वेळी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये अस्वच्छता आढळून आली. त्यामुळे मुकादम सुरेश कांबळे, आकाश नरसिंग, भालचंद्र ओव्हाळ यांना निलंबित करण्यात आले. तर आरोग्य निरीक्षक हनुमंत सावळी, घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षक कविता खरात-सिसोलेकर, सुदेश सारबान आणि विकास खुडे यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड करण्यात आला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply