पुणे : सुधीरकुमार बुक्के न्यायाधीश संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध

पुणे - पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के  यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा न्यायाधीश संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड  करण्यात आली आहे. पुणे जिल्हा बार असोसिएशन, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि धर्मादाय ट्रस्टच्या वतीने त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले आहे.

सह धर्मादाय आयुक्त बुक्के यांनी कोरोना कालावधीत प्रशंसनीय कार्य केले. झिरो पेंडेन्सीसाठी विशेष अभियान राबविण्यात आले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे धर्मादाय विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. तसेच, धर्मादाय विभागात कार्यरत असताना राज्यस्तरीय पदावर निवड होणारे बुक्के हे प्रथमच न्यायिक अधिकारी आहेत.

बुक्के यांच्या निवडीबद्दल पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे यांनी विशेष सत्कार केला. तसेच, आळंदी देवस्थान, जेजुरी देवस्थान, दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट यांच्यासह विविध धर्मादाय संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागीरदार, सचिव ॲड. सुनील मोरे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दिलीप हांडे आदी उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply