पुणे : सायबर चोरट्यांच्या ज्येष्ठाला साडेअकरा लाख रुपयांचा गंडा; बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी

 

पुणे : बँक खाते अद्ययावत करण्याच्या बतावणीने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला साडेअकरा लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक व्यावसायिक आहेत. त्यांचे दोन खासगी बँकात खाते आहे. चोरट्यांनी ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. बँक खाते अद्ययावत करायचे आहे.

खाते अद्ययावत न केल्यास व्यवहार करता येणार नाही, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला एक लिंक पाठविली. लिंक उघडून एनी डेस्क ॲप उघडण्यास सांगितले. या ॲपमध्ये ज्येष्ठाला बँक खात्याची माहिती भरायला सांगितले. ज्येष्ठाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला आहे. चोरट्यांनी ज्येष्ठाच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने ११ लाख ५७ हजार ६९२ रुपये लांबविले. खात्यातून पैसे लांबविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कोंढवा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply