पुणे : श्रद्धा वालकर तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ, पुण्यात पतित पावन संघटनेकडून मशाल पेटवून निषेध

पुणे : पालघर येथील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीचा प्रियकर आफताब पूनावाला याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे सुमारे ३५ तुकडे केले. ही घटना समोर आल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील सारसबागे समोरील अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यासमोर पतित पावन संघटनेकडून मशाल पेटवून निषेध नोंदविण्यात आला. तर यावेळी उपस्थित महिलांनी आरोपी तरुणाचा फोटो जाळून निषेध नोंदविला.

यावेळी पतित पावन संघटनेचे प्रवक्ते स्वप्निल नाईक म्हणाले की,श्रद्धा वालकर या तरुणीचा प्रियकर आफताब पूनावाला या तरुणाने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेतील आरोपी तरुणाला जनतेच्या हातांमध्ये द्यावे, जनताच त्याचा सोक्षमोक्ष लावले.तसेच लीव इन आणि लव जिहाद सारख्या गोष्ट मोडीत काढल्या पाहिजेत.यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.तसेच मयत तरुणीला न्याय मिळावा.यासाठी आम्ही अखेरीपर्यंत आमचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *