पुणे : शिवसृष्टीचा पहिला टप्पा पूर्ण; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण

शिवसृष्टी’ हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक संकल्पना प्रकल्प असून त्याचा पहिला टप्प्या असलेल्या सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन आणि बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड आणि विशाळगड या गड–किल्ल्यांची सफर घडविणारा ‘दुर्गवैभव’ हा भाग, शिवकालीन शस्त्रांचे विशेष दालन ‘रणांगण’, शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन आणि महाराजांची आग्रा येथून झालेली सुटकाही एका विशेष दालनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभविता येणार आहे. तसेच मॅड मॅपिंगद्वारे प्रत्यक्ष छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे भाषण ऐकण्याची अनुभूती देखील मिळणार आहे, अशी माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी दिली. प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, अरविंद खळदकर, सुधीर मुतालिक, श्रीनिवास वीरकर आणि ‘शिवसृष्टी’चे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार हे देखील या वेळी उपस्थित होते.

दरम्यान, लोकार्पण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.

राज्य सरकारकडून एकही रुपया मिळालेला नाही

शिवसृष्टी एकूण चार टप्प्यात उभारण्यात येत असून प्रकल्पाचा खर्च ४३८ कोटी रुपये आहे. आतापर्यंत उत्स्फूर्तपणे देणगीदारांकडून या प्रकल्पाला ६० कोटी रुपये मिळाले. त्याचा उपयोग पहिल्या टप्प्याच्या उभारणीत करण्यात आला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये राज्य सरकारने ५० कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. मात्र, आतापर्यंत राज्य सरकारकडून एकही रुपया प्राप्त झालेला नसल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply