पुणे : शाईफेक प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींवरील कलम ३०७ मागे घेण्याचे फडणवीसांंचे आदेश:

पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडे या तरुणावर लावण्यात आलेले कलम ३०७ मागे घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी दिले असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी निलंबीत करण्यात आलेल्या ११ पोलिसांचे निलंबनही मागे घेण्यात यावे असेही आदेश फडणवीसांनी दिले असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

भाजप नेते तथा तंत्र व उच्चशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी औरंगाबादेत महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी शाईफेक करणाऱ्या आरोपी मनोज गरबडेविरोधात पोलिसांनी कलम ३०७ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. सोबतच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कुचराई केल्याचा ठपका ठेवत ११ पोलिसांचे निलंबन करण्यात आले होते, तसेच एका पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी आरोपी मनोज गरबडे याच्यावर ३०७ हे हत्येचे कलम लावल्याच्या विरोधात अनेक आंबेडकरी संघटनांनी तीव्र निषेध केला होता. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील मनोज गरबडे याच्यावर ३०७ कलम लावल्याबद्दल विरोध केला होता. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना मनोज कलम ३०७ मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ११ पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात यावे असे आदेशही फडणवीसांनी पोलिसांनी दिले असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाईफेकीच्या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत शाईफेकीला विरोध दर्शवला होता. फडणवीस म्हणाले होते की, चंद्रकांत पाटील  यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही अश्या पद्धतीने टार्गेट करणं हे अयोग्य नाही. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. शब्द चुकला असेल तरी आशय लक्षात घेतला पाहिजे. मी माध्यमांना दोष देत नाही पण आशय दाखवायला पाहीजे. जे आंदोलन करत आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही अश्या पद्धतीने टार्गेट करणं हे योग्य नाही असं म्हणत त्यांनी शाईफेकीचा निषेध केला होता. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply