पुणे : शरद पवार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर, बदलत्या राजकीय परिस्थितीवर काय बोलतील, याकडे लक्ष

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी एकाच व्यासपीठावर आले आहेत. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वीभूमीवर दोघे काय वक्तव्य करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभाला पवार आणि शिंदे यांच्यासह राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आदी उपस्थित आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *